आमचा प्रवास
तुमचे विश्वसनीय आरोग्य सेवा गंतव्य
आपल्याकडे आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते. म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती अशी आपली धारणा आहे. आरोग्य म्हणजे काय तर WHO असे सांगते की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची रोगमुक्त अवस्था म्हणजे आरोग्य. आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून आरोग्य सेवेसाठी 'गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकआणि रिसर्च सेंटर'च्या माध्यमातून कार्यरत आहोत. जसजसा काळ पुढे सरकतो आहे, तसतसे आजारांचे स्वरूप भयंकर होत चालले आहे. आज घरटी किमान दोघांना काही ना काही औषधें सातत्याने सुरु असतात.
गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरची पहिली पिढी म्हणजे कै. महादू गायकवाड. पूर्वीच्या काळी जडीबुटी आणि पारंपरिक औषधी ज्ञानाचा वापर करून कै. महादू गायकवाड ह्यांनी अनेक रुग्णांना बरे केले