सतत खाज येणे, त्वचा पांढरी पडणे, त्वचेवर डाग, चट्टे उमटणे, सोरायसिस, फोड, पुरळ येणे, पिंपल्स, त्वचा काळवंडणे, उन्हामुळे संसर्ग होणे.
रक्तातली शुगर नियंत्रणात नसणे, विविध औषधे घेऊनही शुगर सतत वाढलेली असणे, सारखी तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक सहन होणे, एकदम चक्कर आल्यासारखे होणे.
व्यसनांमुळे धाप लागणे, छातीत जड वाटणे, छातीत धडधड होणे, खूप घाम येणे, अस्वस्थ वाटणे, बीपी अनियंत्रित असणे.
मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे आजार जास्त बळावतात. सारखा थकवा, लघवीला त्रास, पायात व अंगठ्यात सूज, लघवीतून रक्त पडणे, डोळ्याभवती सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसतात
आजच्या धकाधकीच्या जीवनात कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच कर्करोगाचा सामना करावा लागतो आहे. कर्करोगावर सहाय्योपचार ठरतील अशी औषधे घेणे फायदेशीर ठरते.
प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागली की आजार पटकन व्हायला लागतात. सर्दी, ताप, खोकला असे आजार नित्याचे होतं चालले आहेत. असे आजार एकाकडून दुसऱ्याला होतं जातात. ह्या आजारांवर उपचार घेतल्याने असे आजार बळावत नाहीत.
वाढत्या प्रदूषणाचा श्वसन विकार वाढण्यात मोठा वाटा आहे. कोव्हीड काळानंतर अनेकांना श्वसन विकार जडले आहेत. श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास अपुरा पडणे, घरघर आवाज येणे, सतत सर्दीची समस्या असणे, दम लागणे, धाप लागणे अश्या विविध श्वसनाच्या आजारांवर तातडीने उपचार करणे अत्यावश्यक आहे.
PCOD, PCOS, थायरॉईड, अंगावरून पांढरे जाणे, ओटीपोटात दुखणे, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे, मासिक पाळी अनियमित असणे, गर्भाशयाशी संबंधित समस्या अश्या आजारांवर वेळीच उपचार केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.
फिट्स येणे, झटके येणे, सतत चक्कर येणे, अंधारी येणे, डोकेदुखी अश्या मज्जारज्जू विषयक आजारांवर वेळीच उपचार करणे फायदेशीर. तसेच स्नायूंच्या विविध आजारांवर देखील उपचार केले जातात.