About us

Ayurvedic Image

आपल्याकडे आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते. म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती अशी आपली धारणा आहे. आरोग्य म्हणजे काय तर WHO असे सांगते की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची रोगमुक्त अवस्था म्हणजे आरोग्य. आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून आरोग्य सेवेसाठी 'गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकआणि रिसर्च सेंटर'च्या माध्यमातून कार्यरत आहोत. जसजसा काळ पुढे सरकतो आहे, तसतसे आजारांचे स्वरूप भयंकर होत चालले आहे. आज घरटी किमान दोघांना काही ना काही औषधें सातत्याने सुरु असतात.

गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरची पहिली पिढी म्हणजे कै. महादू गायकवाड. पूर्वीच्या काळी जडीबुटी आणि पारंपरिक औषधी ज्ञानाचा वापर करून कै. महादू गायकवाड ह्यांनी अनेक रुग्णांना बरे केले. अनेक वनस्पती, मुळे, झाडपाला, फळं, फुले ह्यांचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करून रोगावर कै. महादू गायकवाड इलाज करायचे.त्यांच्यानंतर श्री सबाजीराव गायकवाड ह्यांनी त्यांच्याकडे वंशपरंपरेने आलेल्या औषधी ज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावशाली औषधें तयार केली. रुग्णांच्या आजारांचे आणि त्यांना दिलेल्या औषधोपचारांच्या नोंदी ठेवून त्यावर अभ्यास त्यांनी सुरु ठेवला.

ह्यासगळ्याचा फायदा अचूक औषध निर्माण करण्यात झाला. श्री सबाजीराव ह्यांना आयुर्वेद विषयात असेलेली आवड त्यांना पुढे कृषी क्षेत्रात काम करण्यास प्रवृत्त करणारी ठरली. औषधे आणि त्यासाठी लागणारी झाडे, मुळे पानं, फुलं ह्यांची लागवड करताना त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. त्यात ते रमले. शेतीचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी काही अश्या गोष्टी शोधून काढल्या की ज्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला. लागवड असेल, औषध फवारणी असेल, तण व्यवस्थापन, कीड नियंत्रण ह्यावर त्यांनी सोप्या आणि कमी खर्चातल्या उपाययोजना शोधून सर्वदूर पोहोचवल्या. ह्यामुळे त्यांना कृषिभूषण हा सन्मान लाभला.

आज आयुर्वेदिक औषधांच्या बरोबरच कृषीक्षेत्रातही श्री सबाजीरावांचे नाव सुपरिचित आहे. आज महाराष्ट्रात गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरच्या औषधांचे जवळपास ५०हून अधिक डिस्ट्रिब्युटर आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे आणि पारनेर ह्या तीन ठिकाणी क्लिनिक आहेत. अनेक रुग्ण पोस्टाने, कुरियरने औषधे नियमितपणे मागवीत असतात. आजवर गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक रुग्णांना औषधोपचार देण्यात आला आहे. कोरोना साथीत अनेक रुग्णांना घरपोच औषधे पाठवून बरे करण्यात आले आहे.

आता गेल्या काही वर्षांपासून श्री सबाजीरावांचे सुपुत्र श्री राहुल गायकवाड ह्यांनी गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटर सर्वच पातळीवर घौडदौड करत आहे. औषधे तयार करण्यात एक निश्चित अशी सुसूत्रता, अचूक संशोधन आणि व्यवस्थापन, रुग्णांच्या माहितीनुसार, लक्षणानुसार औषध निर्माणात केलेला बदल ह्या सगळ्या गोष्टींकडे - श्री राहुल गायकवाड हे नीट लक्ष ठेवून आहेत.

तीन पिढ्यांच्या ह्या आरोग्यसेवेचा लाभ अनेक रुग्ण घेत आहेत. आज गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरसोबत अनेक लोकं जोडली गेली आहेत. आमच्यासोबत खालील मंडळी देखील तनमनाने झोकून देऊन काम करत आहेत.

संघ

विविधतेत एकता, समान ध्येयाकडे वाटचाल

Dr. Madhuri Mam image

डॉ. माधुरी गायकवाड

Dr. varsha Mam image

डॉ. वर्षा मार्कर

Rahul Gaikwad image

राहुल गायकवाड

आमच्या शाखा

आमच्या क्लिनिकच्या शाखांविषयी अधिक जाणून घ्या.

clinic 1
clinic 2
clinic 3
clinic 4
clinic 5

अहिल्यानगर क्लिनिक

locationPin

ऑफिस क्र. ९, पहिला मजला, महानगर बँके शेजारी, मार्केट यार्ड, महात्मा फुले चौक, अ.नगर

phoneIcon

9595535787 | 9420752531

पुणे क्लिनिक

locationPin

३०७, ब्लॉक २, लॉयड्स चेंबर्स, आंबेडकर भवन शेजारी, मालधक्का चौक, मंगळवार पेठ, पुणे

phoneIcon

9595535787 | 9420752531

pune clinic 2
pune clinic 3
pune clinic 1

ध्येय आणि उद्दिष्टे

निरोगी उद्याची लागवड करणे, सर्वसमावेशक वेलनेसद्वारे जीवनाला सक्षम बनवणे

ध्येय

जगातील प्रत्येकजण निरोगी आणि सुदृढ राहावा ह्यासाठी पारंपरिक शेती आणि पारंपरिक औषधी ह्याची सर्वदूर प्रचिती येण्यासाठी कार्यरत राहणे.

उद्दिष्टे

ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून विविध लक्षणांची, आजारांची माहिती गोळा करून त्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने तसेच खात्रीशीर अशी औषधे सातत्याने निर्माण करणे. आजारी रुग्णांना लाभ व्हावा ह्यासाठी रुग्ण तपासणी आणि औषधी सेवा ह्यांची एक साखळी उभी करणे.

Copyright ©Gaikwad Ayurvedic Clinic. All right reserved. Design & Developed by Sharp Multimedia